
पुणे, 20 मार्च (हिं.स.)। अशोक खरात प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात यांच्याशी फक्त ट्रस्ट (शिवनिका ट्रस्ट) पर्यंतचा संबंध होता असं म्हणणं खोटं आहे. रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्या पाद्यपूजा करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत तसेच तसेच सोमवती अमावस्येला करंगळी कापून काळ्या जादूचा विधी केल्याचा आरोप ही अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांनी संविधानिक पदावर राहून जर असे अघोरी कृत्य केले असेल तर त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. तसेच त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी.अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांचे दोन फोटो दाखवले एक फोटो ज्यात हातावर मेहंदी दिसते. दुसरा फोटो ज्यात त्यांच्या हाताची करंगळी कापलेली अन् बँडेज लावलेली दिसते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु