लातूर - उदगीर शहरात माहेश्वरी समाजाच्या वतीने गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात
लातूर, 20 मार्च, (हिं.स.)। उदगीर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मारवाडी समाजाच्या वतीने गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने उदगीरकरांचे लक्ष वेधून घेतले. लाडक्या गणराय
गणगौर उत्सव


लातूर, 20 मार्च, (हिं.स.)। उदगीर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मारवाडी समाजाच्या वतीने गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने उदगीरकरांचे लक्ष वेधून घेतले. लाडक्या गणरायाची आणि गौर माताची आराधना करण्यासाठी महिलांसह अबालवृद्धांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

पारंपारिक वेशभूषा आणि बँड ने

शोभायात्रेची सुरुवात झाली शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून करण्यात आली. यावेळी पारंपारिक वेशभूषेतील महिलांनी डोक्यावर कलश आणि गणगौरच्या मूर्ती घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढली. यात्रेच्या अग्रभागी असलेल्या बँड ने वातावरणात एक वेगळाच उत्साह भरला होता.

भक्तीचा महापूर आणि स्वागत

शहरातील विविध चौकांमध्ये या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून नागरिकांनी गणगौरीचे दर्शन घेतले. गणगौर माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

सांस्कृतिक वारशाचे दर्शन

हा उत्सव केवळ धार्मिक नसून तो सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा नव्या पिढीनेही तितक्याच उत्साहाने जोपासल्याचे या शोभायात्रेच्या माध्यमातून स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande