रत्नागिरीतील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुनीता चव्हाण यांचे निधन
रत्नागिरी, 20 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच स्वस्तिक हॉस्पिटल आणि चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉ. सौ. सुनीता रमेश चव्हाण यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. डॉ. चव्हाण यांनी आपल्या सेवाभावी वृत
डॉ सुनीता चव्हाण


रत्नागिरी, 20 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच स्वस्तिक हॉस्पिटल आणि चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉ. सौ. सुनीता रमेश चव्हाण यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.

डॉ. चव्हाण यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने आणि वैद्यकीय कौशल्याने असंख्य महिलांना आरोग्यसेवा दिली. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांचे जिल्ह्यात मोठे योगदान असून त्यांच्या कार्याची दखल सर्व स्तरांतून घेतली जात होती.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी माळनाका येथील स्वस्तिक बंगला येथे ठेवण्यात आले होते. असंख्य चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघून चर्मालय स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

कै. चव्हाण यांच्या पश्चात पती डॉ. रमेश चव्हाण, पुत्र डॉ. नितीन रमेश चव्हाण, कन्या डॉ. सौ. पल्लवी यादव यांच्यासह मोठा परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande