मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक
मुंबई, २१ मार्च (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामे पार पाडण्यासाठी, रविवार, दि. २२.०३.२०२६ रोजी ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ‘ट्रान्स हार्बर’ मार्गावर खालीलप्रमाणे ''मेगा ब्लॉक'' राबवणार आहे:
मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक


मुंबई, २१ मार्च (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीची कामे पार पाडण्यासाठी, रविवार, दि. २२.०३.२०२६ रोजी ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ‘ट्रान्स हार्बर’ मार्गावर खालीलप्रमाणे 'मेगा ब्लॉक' राबवणार आहे:

ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत, वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ठाणे येथून १०.३५ ते १६.०७ वाजेपर्यंत वाशी / नेरुळ / पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या 'डाऊन' मार्गावरील सेवा, तसेच पनवेल / नेरुळ / वाशी येथून १०.२५ ते १६.०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या 'अप' मार्गावरील सेवा रद्द राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande