अमरावतीत महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन
- ४ हजार ९८ शेतकऱ्यांकडे १०६ कोटींची थकबाकी अमरावती, 21 मार्च (हिं.स.) | अमरावती जिल्ह्यातील ७.५ एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे असलेल्या वीजबिलाची थकबाकी वसुल करण्यासाठी आता महावितरणे शेतकऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे
महावितरणचा वीजबिलासाठी शेतकऱ्यांकडे मोर्चा


- ४ हजार ९८ शेतकऱ्यांकडे १०६ कोटींची थकबाकी

अमरावती, 21 मार्च (हिं.स.) | अमरावती जिल्ह्यातील ७.५ एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे असलेल्या वीजबिलाची थकबाकी वसुल करण्यासाठी आता महावितरणे शेतकऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.

बळीराजा मोफत वीज योजना ही सर्व कृषीपंपधारकांसाठी लागू नसून केवळ ७.५ एचपीपेक्षा कमी क्षमतेच्या कृषीपंपांसाठीच लागू असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. या योजनेअंतर्गत शासनाने २०२५ ते २०३० या कालावधीत अशा पंपांचे चालू वीजबिल शून्य केले आहे. मात्र ७.५ एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारकांना वीजबिल भरणे बंधनकारक असल्याचे महावितरणने पुन्हा अधोरेखित केले आहे. परिमंडळातील सुमारे २ लाख ८० हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ मिळत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील ४ हजार ९८ शेतकऱ्यांकडे १०६ कोटी २ लाख रुपयांची थकबाकी आहे, त्यामुळे महावितरणने थकबाकीदार शेतकऱ्यांना वेळेत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande