
बीड, 21 मार्च (हिं.स.)।
माजलगाव शहरातील मंगलनाथ मंदिर येथे रामनवमी व हनुमान जयंती निमित्त भागवताचार्य विष्णु महाराज देशमुख कनकेश्वर यांच्या संगीत तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले असून या कथेचा लाभ घेण्याच्या आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
रामनवमी व हनुमान जयंतीचे औचित्य साधून येथील बायपास रोड वरील मंगलनाथ मंदिर येथे दि.२६ रामनवमी ते दि.२ एप्रिलपर्यंत श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवताचार्य विष्णू महाराज देशमुख कनकेश्वर संभाजीनगर यांच्या संगीत तुलसी रामायणाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी पारायण सात ते दहा तर सकाळी ११ ते ३ या वेळेत तुलसी रामायण कथा तसेच
रात्री आठ ते दहा हरिकीर्तन होणार आहे. हरी कीर्तनात दि.२६ रोजी भागवताचार्य विष्णु महाराज देशमुख, रामायणाचार्य गोपाळ थोटे, शंकर महाराज चिंचकर जालिंदर महाराज नेहरकर, सिद्धेश्वर महाराज गाडे, तुकाराम महाराज शास्त्री, श्रीराम महाराज शेळके, महादेव महाराज इरळतकर यांचे कीर्तन तर गोविंद महाराज नाईकवाडे यांचे दि.२ रोजी काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत रामायणाचे यजमान ज्योती डक व शर्मिष्ठा डक हे असून महाप्रसादाचे यजमान सचिन डक हे आहेत. या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्ताने घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis