बीड - धारुरमध्ये एसबीआय ग्राम सक्षम प्रकल्पातून होणार प्रगती
बीड, 21 मार्च (हिं.स.)। धारूर तालुक्यात एसबीआय फाउंडेशन व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या एसबीआय ग्राम सक्षम प्रकल्पामुळे ग्रामीण भागात विकासाची नवी लाट निर्माण झाली आहे. या प्रकल्पामागे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व द
बीड - धारुरमध्ये एसबीआय ग्राम सक्षम प्रकल्पातून होणार प्रगती


बीड, 21 मार्च (हिं.स.)।

धारूर तालुक्यात एसबीआय फाउंडेशन व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या एसबीआय ग्राम सक्षम प्रकल्पामुळे ग्रामीण भागात विकासाची नवी लाट निर्माण झाली आहे. या प्रकल्पामागे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व देणारे स्वपन धर (मॅनेजिंग डायरेक्टर व मुख्य कार्यकारी अधिकारी एसबीआय फाउंडेशन, मुंबई) यांचे योगदान विशेष ठरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रकल्प शेतकरी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श ठरत आहे.

या प्रकल्पांतर्गत धारूर तालुक्यात एकूण पाच किसान सेवा केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांच्या माध्यमातून गावातील

अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. विशेषतः नांगरणीसाठी केवळ २०० प्रति एकर या दराने सेवा दिली जात असून, प्रति शेतकरी दोन एकरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक दिलासा मिळत आहे. याचबरोबर, ग्राम सेवा प्रकल्पांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. शाळांमध्ये संगणक सुविधा व डिजिटल क्लासरूम, गावांसाठी माहिती केंद्र, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचे युनिट उभारण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांमुळे ग्रामीण भागात शिक्षण, माहिती व आरोग्याच्या सुविधा

अधिक सक्षम झाल्या आहेत. हिंगणी येथे पंचक्रोशीतील सर्व गावांसाठी एक आधुनिक किसान भवन उभारण्यात आले असून, हे केंद्र शेतकऱ्यांसाठी माहितीचे प्रमुख ठिकाण ठरत आहे. येथे शेतकऱ्यांना विविध ऑनलाइन सेवा, शासकीय योजना व कृषीविषयक माहिती सहज उपलब्ध होत आहे. भविष्यात हे किसान भवन शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक केंद्र म्हणून कार्य करणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande