पुणे शहर पोलीस भरती प्रक्रियेत उद्या लेखी परीक्षा
पुणे, 21 मार्च (हिं.स.)। पुणे शहर पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेचे आयोजन रविवारी (२२ मार्च) आयोजन करण्यात आले आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि चार रंगीत छायाचित्रे (पासपोर्ट साईज) घेऊन परीक्षेच्या आधी तीन त
Pune Police


पुणे, 21 मार्च (हिं.स.)।

पुणे शहर पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेचे आयोजन रविवारी (२२ मार्च) आयोजन करण्यात आले आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि चार रंगीत छायाचित्रे (पासपोर्ट साईज) घेऊन परीक्षेच्या आधी तीन तास परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे शहर पोलिसांच्या प्रशासन विभागाने केले आहे.पुणे शहर पोलीस भरती शिपाई भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. १२ मार्चपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. भरती प्रकियेत सहभागी झालेल्या ८८ हजार १२५ उमेदवारांची शारिरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी घेण्यात आली. मैदानी चाचणी स्पर्धेत ५० टकक्यांहून जास्त गुण मिळवलेले लेखी परीक्षेस पात्र ठरले. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २० हजार ६९ उमेदवारांची रविवारी (२२ मार्च) सहा परीक्षा केंद्रावर सकाळी ११ वाजता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.‘या परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी महाआयटीक़डून ऑनलाइन मिळालेले मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र, लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र, तसेच चार रंगीत छायाचित्रे (पासपोर्ट साईज) घेऊन परीक्षेच्या आधी वेळेआधी तीन तास अगोदर सकाळी आठच्या सुमारास परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना पाणी, पेन, रायटिंग पॅड असे साहित्य पुरविण्यात येणार आहे,’ असे आवाहन शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande