शाहू महाराजांनी सामाजिक लोकशाहीची रुजवन देशात पहिल्यांदा केली - डॉ . व्यंकटेश लांब
छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च (हिं.स.)। मराठी माणसाच्या मनावर कायम अधिराज्य गाजविणारे छत्रपती शिवराय व शाहू महाराज हे दोनच राजे आहेत. विशेषतः राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक लोकशाहीची रुजवन देशात पहिल्यांदा केली, असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य,
Q


छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च (हिं.स.)। मराठी माणसाच्या मनावर कायम अधिराज्य गाजविणारे छत्रपती शिवराय व शाहू महाराज हे दोनच राजे आहेत. विशेषतः राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक लोकशाहीची रुजवन देशात पहिल्यांदा केली, असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य, इतिहासाचे अभ्यासक डॉ .व्यंकटेश लांब यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे राजर्षी शाहु महाराज अध्यासन केंद्र आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थशास्त्र विभागात राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचा विषय 'राजर्षी शाहु महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता' हा होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक पवार सर हे होते. तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. व्यंकटेश लांब, (प्राध्यापक इतिहास विभाग, इंदराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिल्लोड) तसेच डॉ. शैलजा बरुरे राज्यशास्त्र विभाग ( एस. आर. टी. महाविद्यालय आंबेजोगाई) हे होते. या परिसंवादाचे आयोजन राजर्षी शाहु महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने करण्यात आले. केंद्राच्या संचालक डॉ. कृतिका खंदारे यांच्यासह परिसंवादामध्ये अर्थशास्त्र विभागातील डॉ. महाजन, डॉ. पाटील, डॉ. देशमुख, डॉ. नरवडे, डॉ. कोकाटे, डॉ. बाळासाहेब सराटे आधी यावेळी उपस्थित होते. या परिसंवादामध्ये प्रमुख वक्त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळातही कशी लागू होते, यासंबंधीचे विवेचन केले. यांमध्ये डॉ. व्यंकटेश लांब म्हणाले, अस्पृश्यता निवारण, सर्वांसाठी शिक्षण आणि उत्तम शेती ही शाहू महाराजांच्या कार्याची महत्वाची त्रिसूत्री होती. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकांच्या नेहमी ज्ञात असलेले लोकांच्या मनामनात असलेले दोन राजे आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे राजर्षी शाहू महाराज. तसेच दुसरे व्याख्याते डॉ.शैलजा बरुरे यांनी ’राजर्षी शाहु महाराज व त्यांचा सामाजिक न्याय’ या विषयाच्या अनुषंगाने मांडणी केली असतात त्या म्हणाल्या, भारतामध्ये केवळ राजकीय लोकशाही महत्वाची नसुन सामाजिक लोकशाही महत्त्वाची आहे. हा विचार बाबासाहेबांना शाहू महाराजांच्या कार्यातून दिसला. राजर्षी शाहू महाराज झाले नसते तर भारतामध्ये सामाजिक लोकशाही निर्माण झालीच नसती, असे मत डॉ.बरुरे यांनी मांडले. तसेच या कार्यक्रमामध्ये अध्यासन केंद्रामध्ये झालेल्या निबंध स्पर्धेचा निकाल संचालक डॉ. कृतिका खंदारे यांनी जाहिर केल्या. यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस प्रदान करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande