
सोलापूर, 21 मार्च (हिं.स.)।
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ), पुणे येथे विशेष दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, या समारंभात ज्येष्ठ राजकारणी व अनुभवी नेते श्री. सुशीलकुमार शिंदे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट्.) (मानद) ही प्रतिष्ठित पदवी प्रदान करण्यात येणार आहे.हा समारंभ मंगळवार, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) कॅम्पस, लवळे, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.प्रख्यात शास्त्रज्ञ व कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) चे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर, एफआरएस, हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ चे कुलपती, प्रा. डॉ.शां. ब. मुजुमदार, भूषवणार आहेत. तसेच या कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्र- कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन, तसेच कार्यकारी मंडळ व शैक्षणिक मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड