सोलापूर जिल्हा परिषदेची २७ मार्च रोजी सभापती निवड!
सोलापूर, 21 मार्च (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी होत आहेत. या निवडीमध्ये कोणत्या तालुक्यांना संधी मिळणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर स
ZP news solpaur


सोलापूर, 21 मार्च (हिं.स.)।

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी होत आहेत. या निवडीमध्ये कोणत्या तालुक्यांना संधी मिळणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदी बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे इंद्रजित पवार यांना संधी मिळाली आहे. विषय समिती सभापती निवडीत माळशिरस, मोहोळ व माढा तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याला पण संधी मिळणार का? याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

माळशिरस तालुक्यातून भाजपचे दोन सदस्य विजयी झाले आहेत. त्यापैकी संस्कृती सातपुते यांना समाजकल्याण समिती सभापती म्हणून संधी मिळू शकते, अशी सुरवातीपासूनच चर्चा आहे. माळशिरसमध्ये खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात माजी आमदार राम सातपुते यांनी गेल्या महिन्यांपासून कडवा संघर्ष सुरू केला आहे. त्यांच्या या संघर्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेची जोड दिली जाऊ शकते. मोहोळ आणि माढ्यातून सभापतीपदाची कोणाला संधी मिळणार? या बद्दल कमालीची उत्सुकता आहे. वंदना कांबळे यांचे नाव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी चर्चेत होते, त्यांना संधी मिळाली नाही. सभापतीपदाची लॉटरी कांबळे यांना लागणार की आणखी कोणत्या सदस्याला लागणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande