सोलापूर महापालिकेच्या सभागृहात पाणीटंचाईवरून गदारोळ
सोलापूर, 21 मार्च (हिं.स.)। सोलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून एमआयडीसी भागाला हप्ते घेऊन जादा पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला.
smc


सोलापूर, 21 मार्च (हिं.स.)।

सोलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून एमआयडीसी भागाला हप्ते घेऊन जादा पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. एमआयडीसीकडून अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात. याप्रकरणी स्टिंग ऑपरेशन करण्याचा इशाराही त्यांनी सभागृहात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभा सुरू होताच शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, चेतन नरोटे यांनी सभागृहात चुकीचे वंदे मातरम् लावल्याबद्दल आणि मागील सभेचे इतिवृत्त मान्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला व प्रशासनास धारेवर धरले.

नगरसेवक अनंत जाधव शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून दाखल केला. सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांना लक्ष्य करत नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेबाबत जाब विचारला. शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप करत, कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande