अशोक खरात प्रकरणावर यशोमती ठाकूर आक्रमक; संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अमरावती, 21 मार्च (हिं.स.) अमरावतीत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. आरोप झाल्याच वेळीच रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यायला हवा होता, असे त्या म्हणाल्या. या प्र
अशोक खरात प्रकरणावर यशोमती ठाकूर आक्रमक; संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी


अमरावती, 21 मार्च (हिं.स.)

अमरावतीत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. आरोप झाल्याच वेळीच रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यायला हवा होता, असे त्या म्हणाल्या. या प्रकरणात इतरही काही मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्याही राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. चंद्रकांत दादा पाटील,दीपक केसरकर यांच्यासह सात-आठ मंत्र्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा ठाकूर यांनी केला. अशोक खरात प्रकरणात ज्यांचे व्हिडिओ समोर आले आहेत, त्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी आणि संबंधित मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणाबाबत गृहमंत्र्यांना सर्व माहिती असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला असून प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande