पुण्यात ‘घनकचरा’ प्रकल्पाचा वादग्रस्त प्रस्ताव अखेर मागे
पुणे, 21 मार्च (हिं.स.)। उरूळी देवाची येथील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाचशे टनांचा प्रकल्प निविदा न काढता उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला आहे. यापुढे निविदा प्रक्रिया राबवूनच हा प्रकल्प राबविण्याचे महापालिकेने निश्चित केल्याची माहि
Naval Kisahor ram


पुणे, 21 मार्च (हिं.स.)। उरूळी देवाची येथील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाचशे टनांचा प्रकल्प निविदा न काढता उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला आहे. यापुढे निविदा प्रक्रिया राबवूनच हा प्रकल्प राबविण्याचे महापालिकेने निश्चित केल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. शहरात दररोज २ हजार ३०० ते २ हजार ४०० टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी शहराच्या विविध भागांत घनकचरा प्रक्रिया उभारणे नियोजित आहे. पुणे महापालिकेचा उरुळी देवाची येथे घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. येथे आणखी ५०० टनांचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. हा प्रकल्प २० वर्षांसाठी चालविण्यासाठी देण्यात येणार होता. या प्रकल्पात प्रतिटन ६९५ रुपये टिपिंग फी दिली जाणार होती. या प्रकल्पासाठी दर वर्षी १० टक्के वाढ देण्यात आली होती. या कचरा प्रकल्पातील रिजेक्ट वाहतूक आणि वीज बिल हे महापालिकेऐवजी संबंधित ठेकेदाराला द्यावे लागणार होते. हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आयत्यावेळीस आणण्यात आला होता. त्यावेळी प्रकल्प विनानिविदा उभारण्यास देणे चुकीचे असे सांगून काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी विरोध दर्शविला होता. तर हा प्रस्ताव महापालिकेची तिजोरी रिकामी करण्याचा प्रकार असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande