
पुणे, 21 मार्च (हिं.स.)।
घरगुती वापराच्या एलपीजी गॅसला डायमिथाइल इथर हा पर्यायी गॅस शोधण्यास राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधील शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी स्वच्छ ज्वलनक्षम इंधन ऊर्जा सुरक्षितता आज अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची गरज बनली आहे.
भारतातील ८० टक्क्यांहून अधिक जीवाश्म इंधनाची गरज आयातीवर अवलंबून आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विविध भू-राजकीय अडथळ्यांमुळे या ऊर्जा पुरवठ्यावर धोका निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालेल्या एलपीजीच्या किमतीत अलीकडील पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर एलपीजीला पर्याय म्हणून स्वदेशी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक इंधनाचा शोध अत्यावश्यक ठरला आहे. डायमिथाइल इथर (डीएमई) हे असेच एक आशादायी इंधन असून ते स्वच्छ ज्वलनक्षम आहे आणि स्वयंपाक तसेच इतर क्षेत्रांत क्रांती घडवण्याची क्षमता त्यात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु