शिक्षकांना शिस्त लावा; शाळेत थांबण्याची सक्ती करा - दीपक वैद्य
सोलापूर, 21 मार्च (हिं.स.)। जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना प्राथमिक शाळेतील शिक्षकांना शिस्त लावण्याच्या सूचना केल्या. शाळेच्या वेळेत शाळेतच थांबावे, त्यांची कामे शाळेच्या वेळेनंतर करा
ZP news solpaur


सोलापूर, 21 मार्च (हिं.स.)।

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना प्राथमिक शाळेतील शिक्षकांना शिस्त लावण्याच्या सूचना केल्या. शाळेच्या वेळेत शाळेतच थांबावे, त्यांची कामे शाळेच्या वेळेनंतर करावीत, असे सांगत जे शिक्षक मुख्यालयात (ज्या ठिकाणी नियुक्ती आहे) राहत नाहीत, अशा शिक्षकांची यादी सभेत सादर करण्याच्या सूचना केल्या. यावर शिक्षणाधिकारी शेख यांच्याकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष आज पहिल्याच दिवशी अभ्यासासह अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सत्कार स्वीकारण्यात व्यस्त होते. अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटना सत्कार करत सहकार्य करण्याचे आश्वासन देत होते. याच वेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यासह शिक्षण विभागाच्या पूर्ण टीमच्या वतीने अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांचा सत्कार झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande