औसा शहरातील नागरिकांना १०० टक्के शास्ती कर माफी
लातूर, 27 मार्च (हिं.स.)। औसा शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने थकीत मालमत्ता करावरील १०० टक्के शास्ती (दंड) माफ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामागे आ. अभिमन्यू पवार यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला असून,
अभिमन्यू पवार


लातूर, 27 मार्च (हिं.स.)। औसा शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने थकीत मालमत्ता करावरील १०० टक्के शास्ती (दंड) माफ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामागे आ. अभिमन्यू पवार यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंद व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचेही यासाठी आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

नगर विकास विभागाने दि. १९ मे २०२५ रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार औसा नगरपरिषदेकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत औसा नगरपरिषद क्षेत्रातील १९ मे २०२५ पर्यंतच्या थकीत मालमत्ता करावरील संपूर्ण शास्ती माफ करण्यात येणार आहे. मात्र, मूळ कर रक्कम भरावी लागणार असून त्यावर कोणतीही सवलत लागू राहणार नाही.

नागरिकांनी थकीत मालमत्ता कराची पूर्ण रक्कम दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत भरल्यासच त्यांना १००% शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयानुसार जिल्हाधिकारी, लातूर यांनी उर्वरित कर वसुली १००% होईल याची दक्षता घ्यायची आहे तसेचनगरपरिषदेच्या मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांनी या योजनेचा आढावा घेऊन तिच्या अंमलबजावणीचा अहवाल शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. अभय योजनेचा लाभघेण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी औसा नगरपरिषदेकडे अर्ज करणे आवश्यक आहे व या योजनेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मुख्याधिकारी, औसा नगरपरिषद यांना देण्यात आले आहेत.शासनाने स्पष्ट केले आहे. की भविष्यात अशा प्रकारची कोणतीही करसवलत दिली जाणार नाही, त्यामुळे नागरिकांनी ही संधी शेवटची समजून लाभ घ्यावा. या निर्णयामुळे औसा शहरातील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून अनेकांकडून आ.अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande