अमरावती - पेट्रोलची बोंब कायम; सहा पेट्रोलपंप ड्राय
अमरावती, 27 मार्च (हिं.स.)। उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने निर्माण झालेली पेट्रोल-डिझेलची टंचाई लवकरच सुटणार असल्याचे आशादायी चित्र आहे. इंधनाचे टॅंकर पोहोचत असल्याचा दावा अमरावती पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशनने केला आहे. दरम्
शहरातले अनेक पेट्रोलपंप ड्राय अफवांचे पेव मात्र पुरवठा सुरळीत


अमरावती, 27 मार्च (हिं.स.)।

उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने निर्माण झालेली पेट्रोल-डिझेलची टंचाई लवकरच सुटणार असल्याचे आशादायी चित्र आहे. इंधनाचे टॅंकर पोहोचत असल्याचा दावा अमरावती पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशनने केला आहे. दरम्यान, शहरातील सहा पेट्रोलपंप पूर्णतः ड्राय झाले असून ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे त्यांनी विक्रीची मर्यादा लावली आहे. मंगळवार सायंकाळपासून जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील व महामार्गावरील पंपांवरील इंधन संपल्याने त्या भागातील वाहनधारकांनी शहरातील पेट्रोलपंपांवर धाव घेतली. टंचाईमुळे वाहनधारकांनी ओव्हरफिलिंग सुरू केल्याने पेट्रोलचा उठाव वाढून पंप रिकामे होऊ लागले. शहरातील २१ पैकी सहा पेट्रोलपंप पूर्णतः ड्राय झाले आहेत. अन्य पंप त्या मार्गावर आहेत. दरम्यान, पेट्रोल व डिझेलचे टॅंकर्स सायंकाळपर्यंत पोहोचणार असून कालपासून निर्माण झालेली स्थिती आटोक्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहन अमरावती पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशनचे सचिव सौरभ जगताप यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साठ्याची स्थिती जाणून घेत इंधनसाठा मुबलक असल्याचा दावा केला आहे.

विक्रीवर मर्यादा ग्राहक आवश्यकतेपेक्षा अधिक साठा करीत असल्याचे लक्षात आल्याने पेट्रोलपंप धारकांनी विक्रीवर मर्यादा आणली आहे. दुचाकीसाठी पाचशे रुपये व चार चाकी वाहनांसाठी दोन हजार रुपयांचे पेट्रोल देण्यात येत आहे. यापेक्षा अधिक मागणी असली तरी ती पूर्ण करण्यास स्पष्ट नकार देण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande