लातूरमध्ये ‘बीजतुला’ उपक्रम उत्साहात; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
लातूर, 27 मार्च (हिं.स.) :येथील वृक्ष प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘बीजतुला’ उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वडाच्या झा
बीजतूला


लातूर, 27 मार्च (हिं.स.) :येथील वृक्ष प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘बीजतुला’ उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वडाच्या झाडाचे प्रतीकात्मक स्वरूपात ठेवण्यात आले होते, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे उपस्थित होते.

या वेळी समाजोपयोगी कार्यासाठी ओळखले जाणारे प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांची ‘बीजतुला’ करण्यात आली. या उपक्रमातून जमा झालेल्या बियांचे पुढे रोपण करण्यात येणार असून, त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा झाडांच्या रूपाने जपला जाणार आहे.कार्यक्रमात शिवशंकर चापुळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बी. ठोंबरे, संदीप शिंदे तसेच प्राचार्य अनिरुद्ध एच. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande