डोंबिवली - पथ विक्रेता कायदा 2014 कायदा लागू करण्याची मेळाव्यात मागणी
डोंबिवली, 27 मार्च (हिं.स.)। पूर्वेकडे स्टेशनबाहेर परिसरात अनेक महिन्यापासून पालिका प्रशासनाची फेरीवाल्यांवर कडक कारवाई सुरु आहे. सततच्या कारवाईला कंटाळून फेरीवाल्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाबही विचारला होता. मात्र आता आपल्याला न्याय मिळाला पा
Photo2


Photo1


डोंबिवली, 27 मार्च (हिं.स.)। पूर्वेकडे स्टेशनबाहेर परिसरात अनेक महिन्यापासून पालिका प्रशासनाची फेरीवाल्यांवर कडक कारवाई सुरु आहे. सततच्या कारवाईला कंटाळून फेरीवाल्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाबही विचारला होता. मात्र आता आपल्याला न्याय मिळाला पाहिजे असा ठाम निर्णय घेऊन डोंबिवली पूर्वेकडील शुभ मंगल सभागृहात कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता डोंबिवलीच्या वतीने जाहीर मेळावा आयोजत करण्यात आला. या मेळाव्यात मंगळवारी डोंबिवलीत फेरीवाल्यांचा भव्य मोर्चा जेलभरो आंदोलन करणार असा ठाम निर्णय घेण्यात आला.

या मेळाव्यात कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता अध्यक्ष बबन कांबळे, सल्लागार ऍड. प्रशांत सरखोत, भाऊ पाटील, राजू गुप्ता, अरुण पाटील, अभय दुबे, रणदिवे, आशा मगरे, पांडुरंग जाधव, रेश्मा, मुन्नाभाई मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान पथ विक्रेता ( जीविका संरक्षण व रस्त्यावर विक्रीचे नियमन ) कायदा 2014 कायदा लागू करा अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली. 2014 ला फेरीवाला सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर फेरीवाल्यांचे नोंदणी केली पण पुर्णवसन केले नाही असेही मेळाव्यात सांगण्यात आले.

मंगळवारी डोंबिवलीत सकाळी 11 वाजता फेरीवाल्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पासून सुरुवात होऊन भाजी मार्केटहुन बाजीप्रभू चौकावरून इंदिरा गांधी चौकावरून पी पी चेंबर येथील पालिकेच्या फ प्रभागक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. नंतर त्याचवेळी मागण्या मान्य न झाल्यास जेलभरो आंदोलन करू असा इशारा फेरीवाला मोर्चात देण्यात आला. कल्याण येथे पालिकेच्या मुख्यालयात काही दिवसात फेरीवाल्यांचा मोर्चा काढू असा इशाराही यावेळी मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांनी दिला.

या मेळाव्यात आमचे पूर्णवसन करा नंतर कारवाई करा असे फेरीवाल्यांचे म्हणणे होते. तर भाऊ पाटील यांनी पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांचा विचार करावा, त्यांनाही पोट आहे. मग त्यांना जगण्याचा अधिकार नाही का ? फेरीवाला पुर्णवसन कधी करणार असा आमचा प्रश्न आहे असे सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande