नांदेडमध्ये अवैध गावठी पिस्तूल विक्रीवर कारवाई; दोन जण अटकेत
नांदेड, 27 मार्च (हिं.स.) : नांदेड शहरातील विमानतळ ते शिव मंदिर मार्गावरील आसरानगर पाटीजवळ अवैध गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काड
नांदेडमध्ये अवैध गावठी पिस्तूल विक्रीवर कारवाई; दोन जण अटकेत


नांदेड, 27 मार्च (हिं.स.) :

नांदेड शहरातील विमानतळ ते शिव मंदिर मार्गावरील आसरानगर पाटीजवळ अवैध गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रविक्रीविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाला गस्तीदरम्यान गोपनीय माहिती मिळाली की, आसरानगर पाटीजवळ काही जण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीतून पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या दोघांना पुढील तपासासाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार व अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक महेश कोरे तसेच त्यांच्या पथकातील माधव माने, श्रीराम दासरे, संघरतन गायकवाड, मनोज राठोड, सुधाकर देवकते आणि महेश बडगू यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande