राज्य स्पर्धेसाठी रायगड संघ मैदानात; 28 खेळाडूंचा कस
रायगड, 27 मार्च (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दि. 2 ते 6 एप्रिल दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पुरुष व महिला संघाचे सराव शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. राम
28 players' strength; Raigad team in the field for the state tournament


रायगड, 27 मार्च (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दि. 2 ते 6 एप्रिल दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पुरुष व महिला संघाचे सराव शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे.

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हे शिबिर पनवेल येथील सीकेटी कॉलेज (सिक्युरिटी कॉलेज) मैदानावर सुरू आहे.

या शिबिराचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, प्रमोद म्हात्रे, मुंबईकर संघ व्यवस्थापक सचिन पाटील तसेच सीकेटी कॉलेजचे क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर, राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सरकार्यवाह चित्राताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पुरुष 14 आणि महिला 14 अशा एकूण 28 खेळाडूंचा सहभाग असून त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज करण्याचा उद्देश आहे. खेळाडूंसाठी निवास, भोजन तसेच स्पोर्ट किटचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

हे शिबिर दररोज सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत चालणार असून, सर्व खेळाडू दि. 1 एप्रिल 2026 रोजी सिन्नर (नाशिक) येथे रवाना होणार आहेत. या शिबिरातून निवडलेले खेळाडू राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande