
सोलापूर, 27 मार्च, (हिं.स.)। तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात दर गुरुवारी सर्व प्रकारची मांसविक्री बंद करण्यात येणार असल्याची घोषणा आज नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी सोशल मीडियावर केली. असंख्य स्वामिभक्ता ही मागणी करीत होते. अखेर आज अधिकृत घोषणा नगरपालिकेने केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात उघड्यावर होणारी मांसविक्री तसेच दर गुरुवारी सर्व प्रकारच्या मांसविक्रीची दुकाने बंद करण्याची मागणी राज्यभरातील स्वामीभक्त व शहरवासियांकडून होत होती. याचा विचार करून अक्कलकोट नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी यांनी निर्णय घेतला प्रत्येक गुरुवारी मांसविक्री बंद ठेवण्याची सूचना नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील दुकानदारांना केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड