अमरावती मनपाच्या चार समित्यांचे सभापती-उपसभापती बिनविरोध
- भाजप-युवा स्वाभिमानी आघाडीचे वर्चस्व अमरावती, 27 मार्च (हिं.स.) महानगरपालिकेच्या चार महत्त्वाच्या समित्यांचे सभापती व उपसभापती पदांची निवड बिनविरोध पार पडली असून, या निवडीत सत्ताधारी भाजप, युवा स्वाभिमानी तसेच शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले.यामध
मनपाच्या चार समित्यांचे सभापती-उपसभापती बिनविरोध; भाजप-युवा स्वाभिमानी आघाडीचे वर्चस्व


- भाजप-युवा स्वाभिमानी आघाडीचे वर्चस्व

अमरावती, 27 मार्च (हिं.स.)

महानगरपालिकेच्या चार महत्त्वाच्या समित्यांचे सभापती व उपसभापती पदांची निवड बिनविरोध पार पडली असून, या निवडीत सत्ताधारी भाजप, युवा स्वाभिमानी तसेच शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले.यामध्ये शहर सुधार समितीच्या सभापतीपदी भाजपच्या राधा कुरिल यांची निवड झाली असून उपसभापतीपदी युवा स्वामिनीच्या सुमती ढोके यांची निवड झाली आहे. शिक्षण समितीच्या सभापतीपदी युवा स्वाभिमानीच्या प्रीती रेवणे तर उपसभापतीपदी भाजपच्या वंदना मडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ममता आवारे यांची निवड झाली असून उपसभापतीपदी भाजपच्या लता देशमुख यांची निवड झाली आहे. विधी समितीच्या सभापतीपदी शिंदे गट समर्थित बीएसपीचे प्रतिनिधी तर उपसभापतीपदी उभाटा गटाच्या स्नेहा लुल्ला यांची निवड करण्यात आली.दरम्यान, भाजपच्या डॉ. मधुरा कहाळे यांची चारही समित्यांवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. एकूणच या निवड प्रक्रियेत सत्ताधारी भाजप, युवा स्वाभिमानी आणि शिंदे गटाचा प्रभाव दिसून आला असून चारही समित्यांचे सभापती व उपसभापती बिनविरोध निवडून आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande