
रायगड, 27 मार्च (हिं.स.)। नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जाणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन यंदा सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा लोकशाही दिन दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) यांनी दिली आहे. लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी प्रथम तालुका स्तरावरील लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
तालुका स्तरावर दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यासच संबंधित अर्जदारांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपली तक्रार मांडता येणार आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत थेट पोहोचवून त्यावर त्वरित तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)