

अमरावती, 27 मार्च (हिं.स.)
स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ( सुपर स्पेशलिटी) हॉस्पिटल येथे ७० वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. सदर रुग्ण ही काही महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त असल्याने त्यासाठी बाहेर उपचार पद्धती चालू होती व काही महिन्यांपासून डायलिसिस करत होती . तेव्हा डॉक्टरांनी रुग्णास व तिच्या कुटुंबीयास किडनी प्रत्यारोपण विषयी माहिती दिली व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ,अमरावती येथे योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या यशस्वी व विनामूल्य शस्त्रक्रिया यासाठी रुग्ण विविध जिल्ह्यांमधून नव्हे तर इतर राज्यामधून सुद्धा येत असतात याविषयी महिती दिली. तेव्हा आज रुग्णालयात झालेले ७० वे किडनी प्रत्यारोपण, हे ३७ वर्षीय वर्षा संतोष खवासे यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. सदर रुग्ण ही रा कामरगाव, जि. वाशिम येथील रहिवासी असून मागील काही महिन्यांपासून डायलिसिस चालु होते. मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघुन किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी मुलीच्या पुढील भविष्याचा विचार करून वडील रमेश मोतीराम गंथळे (६६) यांनी आपली एक किडनी मुलगी वर्षाला देण्याचा निर्णय घेतला, व आपली एक किडनी वर्षाला देऊन तिला नवीन जीवन दिले. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी