नंदुरबारमध्ये मतदार यादी मॅपिंगसाठी 28 व 29 मार्च रोजी विशेष शिबिरे
नंदुरबार, 27 मार्च (हिं.स.) आगामी काळात महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमा’च्या (SIR) पूर्वतयारीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महत्त्वपूर्ण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सन 2024 च्या मतदार यादीतील मतदारांचे
नंदुरबारमध्ये मतदार यादी मॅपिंगसाठी 28 व 29 मार्च रोजी विशेष शिबिरे


नंदुरबार, 27 मार्च (हिं.स.) आगामी काळात महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमा’च्या (SIR) पूर्वतयारीसाठी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महत्त्वपूर्ण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सन 2024 च्या

मतदार यादीतील मतदारांचे सन 2002 च्या मतदार यादीशी 'मॅपिंग' करण्याचे काम सध्या प्रशासनातर्फे हाती

घेण्यात आले असून, नागरिकांच्या सुविधेसाठी येत्या शनिवारी आणि रविवारी नंदुरबार शहरात विशेष

शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार शिवांश सिंह यांनी एका शासकीय कळविली आहे.

शिबिराची वेळ व ठिकाण

शनिवार दिनांक 28 आणि रविवार 29 मार्च, 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत

शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये ही शिबिरे पार पडतील

येथे होतील शिबिरे (कंसात मतदान केंद्र क्रमांक):

एस. ए. मिशन मराठी हायस्कूल: (२६३ ते २७६)

महात्मा फुले हायस्कूल: (२७७ ते २८०)

अभिनव विद्यालय: (२९१, २९२, २९३, २९४, २९७, २९८)

डी. आर. हायस्कूल: (२९९ ते ३०२,३३१)

नगर परिषद शाळा क्र.-1: (३०३, ३०४, ३०५)

स्वामी विवेकानंद हायस्कूल: (३०६ ते ३११)

नॅशनल गर्ल्स उर्दू हायस्कूल: (३१२ ते ३१७, ३३६, ३४२, ३४३)

डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल: (३२१ ते ३२६)

जी. टी. पाटील कॉलेज: (३२७ ते ३३०)

लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय: (३३२ ते ३३५, ३४४ ते ३४७, ३६३)

अँग्लो उर्दू हायस्कूल: (३३७ ते ३४१)

श्रॉफ हायस्कूल: (३४८ ते ३६०)

नगर परिषद हॉल: (३१८ ते ३२०, ३६१, ३६२, ३६४ ते ३६७)

गटसाधन केंद्र (गुरांचा दवाखाना) हाट दरवाजा: (२८१ ते २९०, २९४ ते २९६).

मतदारांना आवाहन

नागरिकांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन तेथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशीसंपर्क साधावा. आवश्यक ती माहिती देऊन आपले मॅपिंग करून घ्यावे, असेही आवाहन तहसीलदार शिवांशसिंह यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande