पिंपरी-चिंचवड ‘शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प’ प्रभावी; २४ दिवसांत ९१६ टन कचऱ्याचे व्यवस्थापन
पुणे, 27 मार्च (हिं.स.) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी व गवळीमाथा येथे राबविल्या जाणाऱ्या ‘शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प’अंतर्गत कचरा व्यवस्थापन प्रभावी आणि शाश्वत पद्धतीने सुरू आहे. गेल्या २४ दिवसांत या उपक्रमांतर्गत एकूण ९१६ टन कचऱ्याच
pmc


पुणे, 27 मार्च (हिं.स.) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी व गवळीमाथा येथे राबविल्या जाणाऱ्या ‘शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प’अंतर्गत कचरा व्यवस्थापन प्रभावी आणि शाश्वत पद्धतीने सुरू आहे. गेल्या २४ दिवसांत या उपक्रमांतर्गत एकूण ९१६ टन कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात आले आहे.

प्रकल्पानुसार कचरा ज्या ठिकाणी तयार होतो, तिथेच त्याचे वर्गीकरण केले जाते. १ ते २४ मार्च २०२६ या कालावधीत ९१६ टन कचरा संकलित करण्यात आला असून, यामध्ये ६२०.३८ किलो सुका कचरा, ३.२९ टन ओला कचरा, २८०.५० किलो सॅनिटरी कचरा आणि ११.९५ किलो घातक घरगुती कचऱ्याचे सुरक्षित व्यवस्थापन केले गेले.

आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे कचरा विलगीकरण, संकलन आणि विल्हेवाट प्रक्रियेत सुधारणा झाली आहे. कचरा जिथे तयार होतो, तिथे वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीवर विशेष भर दिला जात आहे. यामुळे कचरा वाहतुकीवरील खर्चही कमी झाला असून, जागेवरच कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande