अशोक खरात प्रकरणाला वेग; एसआयटीकडून पुन्हा कार्यालयाची झडती
SIT burns down Kharat's office again
SIT burns down Kharat's


नाशिक, 27 मार्च (हिं.स.) : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा हालचालींना वेग दिला आहे. शुक्रवारी विशेष तपास पथक (SIT) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरात यांच्या प्रॉपर्टी खरेदी-विक्री कार्यालयात जाऊन झडती घेतली. यावेळी काही महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे हाती लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

भोंदू बाबा अशोक खरात यांच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपणार असल्याने तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. विविध प्रकरणांच्या अनुषंगाने तपास सुरू असून, त्यात वनविभागाच्या कायद्यांनुसारही स्वतंत्र तपास करण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, तपास पथकाने पूर्वी सील केलेले कार्यालय पुन्हा उघडून तपास केला आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा सध्या सखोल अभ्यास सुरू आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.या प्रकरणातील तपास पुढील काही दिवसांत आणखी वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande