नरेडको नाशिकच्या अध्यक्षपदी शंतनू देशपांडे
Shantanu Deshpande appointed as president of NAREDCO Nashik
Shantanu Deshpande appointed


सभेत नूतन कार्यकारिणी जाहीर ; भाविक ठक्करमानद सचिव

नाशिक, 27 मार्च (हिं.स.)।

: नरेडको नाशिकची सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत नरेडको नाशिकच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी शंतनू देशपांडे, मानद सचिवपदी भाविक ठक्कर, उपाध्यक्षपदी उदय शाह व मरजयान पटेल, तर खजिनदारपदी भूषण महाजन यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमास नरेडकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजन बांदेलकर, नरेडको महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत शर्मा, नरेडको महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष कमलेश ठाकूर, तसेच उपाध्यक्ष जयेश ठक्कर (नाशिक), हितेश ठक्कर (मुंबई), घनश्याम ढोकणे (नागपूर) आणि राजेंद्र पाटे (पुणे) उपस्थित होते. याशिवाय सहसचिव पंकज कोठारी (अकोला), अरविंद खबाळे (कराड) आणि दिनेश दोषी (रायगड) तसेच नरेडको विदर्भ अध्यक्ष कुणाल पडोळे यांची उपस्थिती लाभली.

यावेळी नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर सौ. हिमगौरी आडके या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सभेदरम्यान नरेडको नेक्स्टजेन (२०२६–२८) कार्यकारिणीची निवड प्रक्रिया देखील पार पडली. नेक्स्टजेन (युवा) अध्यक्षपदी रुचिक शिरोडे, तर सचिवपदी विशाल कोठावदे यांची निवड करण्यात आली. तसेच युवा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

या प्रसंगी विद्यमान अध्यक्ष सुनील गवादे यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा सादर केला. त्यांनी होमेथॉन, जळगाव प्रॉपर्टी एक्स्पो, व्हाइब (खोपोली) सत्र, विविध सेमिनार, कार्यशाळा, चर्चासत्रे तसेच स्थानिक पातळीवर शासकीय विभागांशी केलेल्या समन्वयात्मक पाठपुराव्याचा उल्लेख केला. नरेडको नाशिकचे नूतन खजिनदार भूषण महाजन यांनी लवकरच नरेडको नाशिकचे कार्यालय नाथसिता येवलेकर कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड येथील स्वमालकीच्या प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

निवडणूक प्रक्रियेचे कामकाज ज्येष्ठ सदस्य जयेश ठक्कर, अविनाश शिरोडे आणि अभय तातेड यांनी पाहिले. नूतन कार्यकारिणी १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीत कार्यभार सांभाळणार आहे.

सदस्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहे. संघटनेचे काम अधिक गतिमान व परिणामकारक करणार आहे. नाशिकच्या विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले जाईल.

शंतनू देशपांडे, नूतन अध्यक्ष

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande