नाशिक प्रकरण: सुषमा अंधारे यांनी अशोक खरात आणि नेत्यांवर गंभीर आरोप केले
नाशिक, 27 मार्च (हिं.स.) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि पत्रकार परिषदेत मोठ्या प
नाशिक प्रकरण: सुषमा अंधारे यांनी अशोक खरात आणि नेत्यांवर गंभीर आरोप केले


नाशिक, 27 मार्च (हिं.स.) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि पत्रकार परिषदेत मोठ्या प्रमाणावर फोटो व पुरावे समोर ठेवले.

अंधारेंनी रूपाली चाकणकर, अशोक खरात आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटी व बैठकांचे फोटो दाखवले. त्यांनी भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या खरातसोबतचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवले. हा भस्मासूर (अशोक खरात) कोणी पोसला? त्याला पैसा-आधारा कोणी दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर, तटकरे आणि चौधरी यांच्यातील कथित आर्थिक संबंधांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, निलेश चाकणकर आणि चौधरी यांचा ४५० ते ५०० कोटींचा प्रकल्प असून या मोठ्या आर्थिक ताकदीचे स्रोत स्पष्ट नाहीत. त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे सिन्नर एमआयडीसीशी संबंधित फोटोसह सवाल उपस्थित केला की, शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध?

सुषमा अंधारे यांनी SIT (विशेष तपास पथक) कडे अधिकृत पत्र दिले असून अशोक खरात आणि संबंधित नेत्यांवर आर्थिक व प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी खरातला २०१२ मध्ये बंदुकीचा परवाना मिळाल्याचा आणि २०२४ मध्ये त्याचे नूतनीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केला की, दीड वर्षांपासून खरातच्या कृत्यांचा अहवाल असूनही बंदुकीचा परवाना नूतनीकरण का झाला?

अंधारे यांनी आरोप केला की, अशोक खरातला पाणी देण्यापेक्षा बंदुकीचा परवाना देणे आणि त्याचे नूतनीकरण करणे हे गंभीर आहे, आणि त्यासाठी सध्याचे सरकार जबाबदार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande