जळगाव - वाळू तस्करांकडून ‘हप्ता’ मागणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचे निलंबन
जळगाव, 28 मार्च (हिं.स.) अवैध वाळू तस्करांशी मिलीभगत करून दरमहा ‘हप्ता’ मागणाऱ्या तालुका पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. अवैध वाळू उपशासाठी महिन्याला हप्ता
जळगाव - वाळू तस्करांकडून ‘हप्ता’ मागणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचे निलंबन


जळगाव, 28 मार्च (हिं.स.) अवैध वाळू तस्करांशी मिलीभगत करून दरमहा ‘हप्ता’ मागणाऱ्या तालुका पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.

अवैध वाळू उपशासाठी महिन्याला हप्ता मागतानाचे रामकृष्ण इंगळे याचे वाळू चोरासोबत झालेल्या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात वाळू चोर निमखेडी लगत असलेल्या चंदु अण्णा नगरात २ ट्रॅक्टर चालतात. त्यासाठी अगोदरच्याला ५ हजार रुपये देत असल्याचं सांगतो, यावर हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे कडून आता ४ हजार देण्याचं सांगितलं जातं. एवढेच नाही तर बिनधास्त काम सुरू ठेवण्याचाहि सल्ला दिल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले होते.पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तात्काळ कारवाई करत रामकृष्ण इंगळे याला निलंबित केले

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande