लातूर - शिवपुराण पारायणानिमित्त नगरसेवकांचा सत्कार
लातूर, 29 मार्च, (हिं.स.)। उदगीर शहरातील कपाळे गल्ली येथील महादेव मंदिरात सुरू असलेल्या शिवपुराण व परमहर्ष पारायण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या सहा दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झ
शिवपूराण कथा


लातूर, 29 मार्च, (हिं.स.)। उदगीर शहरातील कपाळे गल्ली येथील महादेव मंदिरात सुरू असलेल्या शिवपुराण व परमहर्ष पारायण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या सहा दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. याच सोहळ्याचे औचित्य साधून नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार सोहळा तसेच भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे विश्वस्त मनोज अण्णा कपाळे यांच्या वतीने उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला, तसेच या सप्ताहात विविध स्वरूपात सेवा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता उद्धव महाराज हरबतपुरे यांच्या आशीर्वचनाने झाली आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, उपनगराध्यक्षा शितलताई नरसिंग शिंदे, माजी नगरसेवक नरसिंग शिंदे, नगरसेविका गंगाबाई कपाळे, नगरसेवक बाळासाहेब पाटोदे, व्यंकटराव बोईनवाड, शशिकांत बनसोडे, शिवकुमार कांबळे तसेच माजी नगरसेविका रेखाताई कानमंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी आपल्या मनोगतात अध्यात्मातून साधलेला विज्ञान यांचा परस्परसंबंध अधोरेखित केला, तसेच कपाळावर लावला जाणारा भस्म, टिळा, उपवास आणि दर्शन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार पटणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयोजक मनोज अण्णा कपाळे यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कपाळे बंधू व महादेव मंदिर समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande