
लातूर, 29 मार्च (हिं.स.)। रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व सोवर्णा फाउंडेशन (लातूर विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर च्या उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयात 20 गरजवंत रुग्णाच्या डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया पार पडली.
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलकडून सातत्याने आरोग्यासाठी घेण्यात येते असलेल्या यशस्वी पुढाकारामुळे सोवर्णा फाउंडेशन (लातूर विभाग ) ने मदतीचा हात पुढे करीत रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल सोबत संयुक्त रित्या हा प्रकल्प हाती घेतला.
या शिबिरात जवळपास लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या 75 रुग्णांची नेत्र तपासणी झाली. दिनांक 29 मार्च 2026 रोजी 20 रुग्णाच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या शिबीरास उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया यांनी रोटरी च्या कार्याचे भरभरून कौतुक केले. प्रकल्पाची इत्यंभूत माहिती विशाल जैन यांनी दिली. तर प्रोजेक्ट चेअरमन विशाल तोंडचिरकर यांनी रुग्णांच्या डोळ्यातील चमक व चेहऱ्या वरील आनंद हिच सेवा प्रमाण मानत, सोवर्णा फाउंडेशन ( लातूर विभाग) व लायन्स क्लब उदगीर यांच्या सहकार्याने भविष्यात देखील अशे प्रकल्प हाती घेऊन गरजवंतांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे वचन दिले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर,रवींद्र हसरगुंडे,व्यंकट कणसे, गणेश जाधव यांच्या सह लॉयन्स क्लबचे डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis