बाल महोत्सवामुळे मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर, 29 मार्च (हिं.स.)। चाचा नेहरू बालमहोत्सव’ हा केवळ क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम नसून सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व आहे, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना, कौशल्यांना , धैर्याला वाव मिळण्यासाठी हा बाल महोत्सव महत्त्वपूर्ण असत
Collactor kumar


सोलापूर, 29 मार्च (हिं.स.)।

चाचा नेहरू बालमहोत्सव’ हा केवळ क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम नसून सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व आहे, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना, कौशल्यांना , धैर्याला वाव मिळण्यासाठी हा बाल महोत्सव महत्त्वपूर्ण असतो,यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. या बाल महोत्सवामुळे मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विभागीय उपआयुक्त संजय माने. कृष्णा राठोड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले,बाल विकास प्रकल्प अधिकारी भुजंग चिंताकोटे.सिंहगड कॉलेज संचालक संजय नवले,बाल कल्याण समिती अध्यक्ष. समीर सय्यद, सदस्य सुवर्णा कोकरे, बाल न्याय मंडळ सदस्य गीता तोतकुल यांच्यासह मान्यवर ,अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, क्रीडा हे एक सांघिक खेळ असून त्यामुळे स्फूर्ती, शिस्त, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते. मुलांनो ,तुम्ही मैदानावर हरले तरी चालेल, पण आयुष्यात कधीही हार मानू नका, आपल्या कर्तृत्वातून आपली ओळख निर्माण करावी राज्यातील पहिलाच ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सोलापुरात होत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande