पुणे - महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा
पुणे, 29 मार्च (हिं.स.)। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर, पक्षात नव्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. महिला प्रदेशाध्य
पुणे - महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा


पुणे, 29 मार्च (हिं.स.)। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर, पक्षात नव्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सना मलिक, सरोज अहिरे, वैशाली नागवाडे, राजलक्ष्मी भोसले आणि प्रतिभा शिंदे यांची नावे आहेत.यापैकी एकाची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणे हे उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यापुढील मोठे आव्हान आहे. अशोक खरात प्रकरणानंतर वाढलेल्या दबावामुळे रूपाली चाकणकर यांनी प्रथम राज्य महिला आयोगातून आणि नंतर पक्षाच्या राज्य महिला अध्यक्षपदावरून राजीनामा दिला. तेव्हापासून या महत्त्वाच्या पदासाठी नवीन नेतृत्वाचा शोध तीव्र झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि विरोधकांकडून होणाऱ्या तीव्र हल्ल्यांमुळे चाकणकर यांच्यावरील नैतिक दबाव वाढला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande