सियावर रामचंद्र की जयच्या घोषणांनी दणाणले नाशिक
Nashik was rocked by sky-high slogans of Ramchandra Ki Jai against Siya.
Nashik was rocked by sky


शहरात श्रीराम व गरुड रथाची मिरवणूक उत्साहात साजरी

नाशिक, 29 मार्च (हिं.स.)।

: श्रीराम आणि गरुड रथोत्सव चैत्र महिन्यातील कामदा एकादशी निमित्त काढण्यात येतो. हा रथोत्स वास रविवारी (दि. २९) सायंकाळी ५ वाजता काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून प्रारंभ झाला. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा लाखो भाविकांची गर्दी झाली होती.

मानकरी पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरात पूजा करून पालखीतून भोगमूर्ती श्रीराम रथात विराजमान करण्यात आल्या. या मूर्तींना रामकुंड येथे परंपरेनुसार अवभृत स्नान घालण्यात आले.

काळाराम मंदिरात यंदाचे मानकरी वंशपरंपरागत पूजाधिकारी नरेंद्रबुवा पुजारी यांच्या हस्ते मूर्तींची पूजा करण्यात आली.

आरती करून मूर्ती श्रीराम रथात स्थापित करण्यात आल्या. यावेळी रामरथ आणि गरुडरथ दोन्ही समांतर उभे करण्यात आले. आरतीनंतर गरुडरथ पुढे रवाना झाला. या रथाच्या पुढे सनई-चौघडा होता. मस्तकावर छत्री धारण केलेले मानकरी परंपरेनुसार रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण झाले.

यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले देवयानी फरांदे बाळासाहेब सानप लक्ष्मण सावजी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. राज्याचे कुंभ मंत्री गिरीश महाजन महापौर हिमगौरी अडके यांच्यासह मंदिराचे पुजारी विश्वस्त यांनी श्रीफळ वाहून रथयात्रेला सुरुवात केली

जबाबदारी श्री काळाराम संस्थानकडे असून, हा रथ ओढण्याचा मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे आहे. रामरथ ओढण्याचा मान रास्ते आखाडा तालीम संघ आणि पाथरवट समाज यांच्याकडे आहे.

दोन्ही रथ काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघाले . नागचौक, चरणपादुका चौक, लक्ष्मण झुला पूल, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, गौरी पटांगण, गाडगे महाराज पुलाखालून रामरथ म्हसोबा पटांगणावर थांबला. तर गरुडरथ गौरी पटांगणावरून रोकडोबा मैदान, पिंपळपार, धुमाळ पॉइंट, मेनरोड, बोहरपट्टी, सरकारवाडा, सराफ बाजार, भांडी बाजार, कपूरथळा, म्हसोबा पटांगण, सांडव्याच्या देवीसमोरून गंगाघाट मार्गे व्यायामशाळेकडे आला. त्यानंतर चांदवडकर गल्ली, अहिल्याराम व्यायामशाळा, रामकुंड येथे दोन्ही रथ एकत्र आले. म्हसोबा पटांगणावर थांबलेला रामरथ गरुडरथाच्या मागे रामकुंडावर नेण्यात आता. या ठिकाणी अवभृत स्नान झाल्यानंतर परशुराम पुरीया रोड, मालवीय चौक, शनिचौक, हनुमान चौक मार्गे रथांचा परतीचा प्रवास काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापर्यंत नेण्यात आला. यावेळी भाविकांनी ठिकठिकाणी रथाचे पूजन करून दर्शन घेतले. रथयात्रा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाखो भाविक या यात्रा उत्सवात सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande