
लातूर, 29 मार्च, (हिं.स.)। उदगीर तालुका माहेश्वरी सभे च्या 2026 - 29 च्या नूतन कार्यकारणी ची निवड आज श्री लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहात पार पडली. लातूर येथून निवडणूक अधिकारी म्हणून हरिप्रसाद सोमाणी, अशोक जाजू, पुरुषोत्तम कालिया,फुलचंद काबरा आले होते. त्यांनी समाजाच्या बैठकीत नूतन कार्यकारणी स्थापना साठी नियम, अटी जाहीर करून अध्यक्ष पदा साठी कोण ईश्वुक आहेत. त्यांनी नावे देण्याचे सांगितले असता अध्यक्ष पदा साठी श्रीनिवास सोनी व रामविलास नावंदर या दोघांनी नावे दिली. निवडणूक अधिकाऱ्यांनी शेवटी गुप्त मतदान घेण्याचे घोषित केले होते. निवडणुकीत 70 मतदान झाले त्यापैकी श्रीनिवास सोनी यांना 54 तर रामविलास नावंदर यांना 16 मते मिळाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी श्रीनिवास सोनी यांना विजयी घोषित केले. तदनंतर नूतन अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली त्यात उपाध्यक्ष बालाप्रसाद मुंदडा,सचिव आनंद बजाज, कोषाध्यक्ष शिरीष नावंदर,सहसचिव कल्पेश बाहेती, संघटन मंत्री प्रणव बागडी तर सदस्य म्हणून राधेश्याम इनानी, अमोल राठी,राजेश सारडा,रुपेश गिल्डा, अतिश बियाणी, डॉ प्रवीण मुंदडा, डॉ भिकमचंद सोनी यांची निवड करण्यात आली. लातूर जिल्ह्यावर डॉ रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, विनोद टवानी , राजगोपाल राठी ,अशोक बाहेती व संजय नावंदर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. या वेळेस समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis