मेळघाट मधील तेंदू वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर
अमरावती, 30 मार्च (हिं.स.) । पूर्वी तेंदू पत्त्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला मेळघाट परिसर आज गंभीर संकटाचा सामना करत आहे. लाखो रुपयांची उलाढाल करणारा तेंदूपत्ता व्यवसाय आणि आरोग्यदायी टेभ्रू फळांसाठी ओळखला जाणारा हा प्रदेश आता हळूहळू तेंदू वृ
मेळघाट मधील तेंदू वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर


अमरावती, 30 मार्च (हिं.स.) । पूर्वी तेंदू पत्त्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला मेळघाट परिसर आज गंभीर संकटाचा सामना करत आहे. लाखो रुपयांची उलाढाल करणारा तेंदूपत्ता व्यवसाय आणि आरोग्यदायी टेभ्रू फळांसाठी ओळखला जाणारा हा प्रदेश आता हळूहळू तेंदू वृक्षांच्या अभावाकडे झुकत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे तेंदू झाडांची संख्या झपाट्याने घटली आहे. विशेषतः पान संकलनाच्या हव्यासापायी अनेक मोठी, परिपक्व झाडे तोडण्यात आली. परिणामी जंगलात आता केवळ लहान झुडपांच्या स्वरूपातील तेंदूची रोपेच शिल्लक राहिलेली दिसतात. तज्ञांच्या मते, मोठ्या झाडांच्या अभावामुळे तेंदूचे नैसर्गिक पुनरुत्पादनही कमी झाले आहे. याचा थेट परिणाम स्थानिक आदिवासीच्या उत्पन्नावर होत असून, टेभ्रूच्या पौष्टिक फळांची उपलब्धताही घटली आहे जंगलातील जैवविविधतेतरही याचे गंभीर परिणाम होत असल्याचे संकेत आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तेंदू वृक्षांचे संरक्षण, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि पान संकलनावर नियंत्रण चांसारख्या उपायांची गरज व्यक्त केली जात आहे. जर वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर मेळघाटमधील तेंदू वृक्ष इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande