बीडमध्ये सृजन-२०२६ तांत्रिक परिसंवाद; २१० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली सहभाग
बीड, 30 मार्च (हिं.स.) : कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित सृजन-२०२६ हा माहिती तंत्रज्ञानावर आधारित विभागीय तांत्रिक परिसंवाद शहरातील मोदी लर्निंग सेंटर, रिंग रोड येथे पार पडला. या परिसंवादात मराठवाड्यातील विविध जि
बीडमध्ये सृजन-२०२६ तांत्रिक परिसंवाद; २१० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली सहभाग


बीड, 30 मार्च (हिं.स.) : कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित सृजन-२०२६ हा माहिती तंत्रज्ञानावर आधारित विभागीय तांत्रिक परिसंवाद शहरातील मोदी लर्निंग सेंटर, रिंग रोड येथे पार पडला. या परिसंवादात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील २१० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.

परिसंवादाचे उद्घाटन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, संचालक डिंपल मोदी, प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, उपप्राचार्य प्रा. वसंतराव चव्हाण, प्राचार्य डी. एच. थोरात, प्रा. राघवेंद्र राजमान्य, समन्वयक डॉ. व्ही. एस. हमदे, सहसमन्वयक प्राचार्य डॉ. तपस्या गुप्ता-परदेशी आदी उपस्थित होते.

परिसंवादात बीएससी, बीसीएस, बी. कॉम, बीसीए व संगणक शाखांतील विद्यार्थी सहभागी झाले. संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, पोस्टर प्रेझेंटेशन पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेत विजेत्यांना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande