छ. संभाजीनगर : घाटीत सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांसाठी २४ प्रवेश
छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च (हिं.स.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिली फेरी पूर्ण झाली आहे. २५ जागांपैकी २४ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील समुपदेशनासाठी २ एप्रिलपर्यंत नोंदणी क
छ. संभाजीनगर : घाटीत सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांसाठी २४ प्रवेश


छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च (हिं.स.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिली फेरी पूर्ण झाली आहे. २५ जागांपैकी २४ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील समुपदेशनासाठी २ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ४ एप्रिलपर्यंत रिक्त जागांचे पर्याय भरून प्रवेश निश्चित करता येईल. निकाल ७ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.

संबंधित महाविद्यालयात ८ ते १६ एप्रिलपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान, सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्र १० एप्रिल पासून सुरू होणार आहे. प्रवेश निश्चित झाले असले तरी अपग्रेडेशनसाठी सर्वच उमेदवार हे दुसऱ्या फेरीकडे लक्ष देवून आहे. दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर

तज्ज्ञ रुजू होण्यास होतील. शासकीय कर्करोग रुग्णालयात डिएम मेडीकल ऑन्कॉलॉजीसाठी चार, डिएम ऑन्को पॅथालॉजीसाठी चार, डीएम पेडियाट्रिक ऑन्कॉलॉजीसाठी चार, एमसीएच गायनाकोलॉजीकल ऑन्कॉलॉजीसाठी चार, एमसीएच हेड अॅण्ड नेक सर्जरीसाठी दोन आणि एमसीएच सर्जीकल ऑन्कॉलॉजीच्या तीन जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, घाटीतील डिएम निओनॅटॉलॉजीसाठी पाच पैकी तीन प्रवेश निश्चित झाले आहेत. घाटीत सीईटी सेलमार्फत अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनात उपाधिष्ठाता डॉ. प्रभा खैरे, प्रवेश समितीच्या सदस्य सचिव डॉ. स्वप्ना अंबेकर, सीईटी सेलचे सचिन आहिर, शिवलाल पाटील, अश्विनी कांगणे ही प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande