
परभणी, 30 मार्च (हिं.स.)।
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या वतीने शालेय राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा घेण्यात आल्या. सदरील येथील स्पर्धेत बाल विद्या मंदिरच्या आदित्य लक्ष्मण पांचाळ या खेळाडूने रोप स्किपिंग स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत डबल अंडर व थर्टी सेकंड स्पीड या दोन प्रकारात गोल्ड मेडल व इंडोरन्स या प्रकारात एक सिल्वर मेडल मिळवले आहे. विजयी संघातील खेळाडूंचे व क्रीडाशिक्षक श्री ज्ञानेश्वर पंडित, श्री संतोष देशमुख, श्री प्रभाकर गमे, यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री नंदकुमार झरकर, सचिव डॉ.श्री विवेक नावंदर व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अरुण बोराडे उपमुख्याध्यापक श्री रामदास तुम्मेवार पर्यवेक्षक श्री प्रदीप रुघे , श्री बळीराम कोपरट कर सौ सीमा बोके यांनी केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis