अकोल्यात बेमौसम पावसाचा फटका; विजेच्या कडकडाटाने आगही भडकली
अकोला, 30 मार्च (हिं.स.) : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ऐन उन्हाळ्यात अकोल्यात अचानक अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. आज सायंकाळी शहरातील अनेक भागात जोरदार पावसासह वीजपुरवठा खंडित झाला. अकोल्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेले
Photo


Photo


अकोला, 30 मार्च (हिं.स.) : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ऐन उन्हाळ्यात अकोल्यात अचानक अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. आज सायंकाळी शहरातील अनेक भागात जोरदार पावसासह वीजपुरवठा खंडित झाला. अकोल्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेलेले असताना या पावसामुळे तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले.

अकोला जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची गहू काढणी अंतिम टप्प्यावर आहे. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे गहू, तसेच टरबूज, निंबू आणि संत्रा यांसारख्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून नागरिकांना त्रास झाला आहे. बाभुळगाव परिसरात एका झाडावर अचानक वीज कोसळल्याने चार ते पाच झाडे भस्मसात झाली, मात्र सुदैवाने जखमी व्यक्ती नाहीत. आग इतकी तीव्र होती की जळलेली झाडे खाक झाली आणि आगीची तीव्रता दूरवरून दिसत होती.

हवामान विभागाने राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता व्यक्त केली आहे, ज्यामुळे पुढील काही तासांत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande