
अकोला, 30 मार्च (हिं.स.)।अकोल्यातील महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत विरोधकांचा आज चांगलाच गोंधळ पहायला मिळाला.. सभेतच आंदोलन सुरू करण्यात आल्याने 16 नगरसेवकांना तीन सभेसाठी निलंबित करण्यात आलं आहे.. यामध्ये काँग्रेससह वंचितच्या नगरसेवकांचा समावेश आहे..आज अकोला महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा आयोजित करण्यात आली होती.. वंचित बहुजन आघाडी कडून स्वीकृत सदस्य म्हणून निवडण्यात आलेले सुनील इंनांनी हे सभागृहात पोहचताच सभेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.. भाजप प्रणित शहर सुधार समितीच्या नगरसेवकांनी पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केली यावर विरोधकांनी ही प्रत्युत्तर देत.. सभेतच ठिय्या आंदोलन सुरू केले... सभा वेळेवर सुरू होत नसल्याने अखेर महापौर शारदा खेडकर यांनी विरोधी पक्षातील 16 नगरसेवकांना निलंबित केले आहे.. पुढील तीन सभेसाठी या सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे... दरम्यान या घटनेचा वंचितकडून याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे.. यावेळी सभे दरम्यान जोरदार संघर्ष पाहायला मिळाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले..
या नगरसेवकांना करण्यात आले निलंबित!
1. मोहम्मद फजलु अब्दुल करीम, प्रभाग १ ड
2. आझादखान अलियारखान, प्रभाग 17 ड
3. गवई पराग रामकृष्ण, प्रभाग 14 क
4. देव निलेश रामकृष्ण, प्रभाग 3 ड
5. शेख शमशु कमर शेख साबीर,
6. डॉ. जिशान हुसैन, प्रभाग 11 ड
7. विजय रामदास इंगळे, प्रभाग 20 अ
8. लंगोटे शंकर भाऊराव, स्विकृत सदस्य
9. निलोफरखान सोहेलखान, प्रभाग 1 क
10. आकाश श्रीकृष्ण कवडे, स्विकृत सदस्य
11. अभय अशोक खुमकर, प्रभाग 4 ड
12. जैनबबी शेख इब्राहिम, प्रभाग 11 अ
13. अशिया परवीन मोहम्मंद शारिक प्रभाग 18 क
14. पातोडे उज्वला प्रविण, प्रभाग 14 अ
15. सुवर्णरेखा विजय जाधव, प्रभाग 7 अ
16. बहादुरकर जयश्री महेंद्र, प्रभाग 14 ब
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे