
अकोला, 30 मार्च (हिं.स.) : माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या हॉलमधील टीव्ही स्क्रीनवर महापौरांच्या सभेचे थेट प्रक्षेपण वारंवार खंडित होत असल्याने पत्रकारांमध्ये मोठी नाराजी पसरली. याविरोधात अनेक पत्रकार संघटनांनी महापौरांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
महापालिका प्रशासनाच्या तांत्रिक त्रुटीमुळे पत्रकारांनी महापौरांकडे लक्ष वेधले. शासकीय कॅमेऱ्याद्वारे चित्रित केले जात असल्यामुळे पत्रकारांनी पारदर्शक माहिती व सुरळीत माहितीप्रवाहाची मागणी केली आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ठिय्या आंदोलनादरम्यान सभापती स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकल्या आणि मार्गदर्शन केले. या संपूर्ण गोंधळामुळे आजची आमसभा वादळी ठरली, ज्यामुळे महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा आणि निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाला.
-----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे