हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर शहरातील खोकडपुरा येथील श्री राधा मोहन मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ना
हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर शहरातील खोकडपुरा येथील श्री राधा मोहन मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमांची सुरुवात १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सहस्रनाम यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ५ ते रात्री ९.४५ या वेळेत संगीतमय सुंदरकांड सादर केले जाणार आहे. याच दिवशीलहान मुला-मुलींसाठी धार्मिक वेषभूषा (फॅन्सी ड्रेस) स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यामधून बालकांमध्ये धार्मिक संस्कारांची जोपासना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. २ एप्रिल रोजी मुख्य श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ६ वाजता महाअभिषेक होणार असून, ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन सचिन आंचलिया, अभिजीत आंचलिया, कुशल आंचलिया, नितीन चोरडिया, ललित भंडारी, सचिन बंब, हर्षल सुराणा, ईश्वर नहाटा, स्वप्निल पारख, परेश जैन, अश्विन संघानी, दीपक फाळके, राजू बोरा, मसारा पाडे, संदीप पाडे आदींच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande