
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च, (हिं.स.)। खुलताबाद नगरपरिषदेने शहर विकास आणि सोयी-सुविधांसाठी कंबर कसली असून, दुसरीकडे थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक वेळा सूचना देऊनही मालमत्ताकर आणि पाणीपट्टी न भरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत नगरपरिषदेने शहरातील मुख्य केंद्र असलेल्या गुलमंडी चौक परिसरातील दोन दुकाने सील केली. या कारवाईमुळे शहरातील मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानदारांकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची मोठी रक्कम दीर्घकाळापासून प्रलंबित होती. प्रशासनाने यापूर्वी संबंधित थकबाकीदारांना कायदेशीर नोटिसा बजावून कर भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, या नोटिसांना संबंधितांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. सदर कारवाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यासाठी पथक करण्यात तयार आले होते. या पथकाने गुलमंडी विविध विभागांचे एक विशेष संयुक्त धडक चौकात देऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर दोन दुकाने सील करण्याची कार्यवाही पूर्ण केली. सदर कारवाई बांधकाम अभियंता ऋषिकेश जोशी, पाणीपुरवठा अभियंता श्रीहरी चोडेकर, कोषागार किशोर मोरे आणि जयकिशन दळवी, स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोळे, अंकुश भराड आणि दिपीक जितेंद्र बोचरे आदींन केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis