अमित ठाकरेंनी घेतली बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट
सोलापूर, 30 मार्च (हिं.स.)। सोलापूरचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर, आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूर येथे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. अमित ठाकरे यांनी बाळासाहेब सरव
AMit Thakare


सोलापूर, 30 मार्च (हिं.स.)। सोलापूरचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर, आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूर येथे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. अमित ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.सरवदे यांच्या पत्नी आणि लहान मुलींचे सांत्वन करताना अमित ठाकरे स्वतःही भावूक झाले. यावेळी त्यांच्या लहान मुलीने केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. निवडणुका जिंकण्यासाठी जर कोणाचे खून होणार असतील, तर अशा निवडणुकाच नकोत, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande