चंद्रपूर : एनएक्सजी कॉईन प्रा. लि. फसवणूक प्रकरणी दोन आरोपी अटकेत
- ठेवी परत मिळण्याकरीता अर्ज भरून देण्याचे आवाहन चंद्रपूर, 30 मार्च (हिं.स.)। एनएक्सजी कॉईन एस.डी. हब (ओपीसी) प्रा. लिमिटेड मध्ये गुंतवणूक सांगून आयडी तयार करण्याकरीता ५० हजार रूपये व महिंद्रा एक्सयुव्ही ३०० वाहने देण्याचे खोटे आमिष दाखवून दोन आरो
चंद्रपूर : एनएक्सजी कॉईन प्रा. लि. फसवणूक प्रकरणी दोन आरोपी अटकेत


- ठेवी परत मिळण्याकरीता अर्ज भरून देण्याचे आवाहन

चंद्रपूर, 30 मार्च (हिं.स.)। एनएक्सजी कॉईन एस.डी. हब (ओपीसी) प्रा. लिमिटेड मध्ये गुंतवणूक सांगून आयडी तयार करण्याकरीता ५० हजार रूपये व महिंद्रा एक्सयुव्ही ३०० वाहने देण्याचे खोटे आमिष दाखवून दोन आरोपींनी १४ लक्ष रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या बाबतचा गुन्हा समोर आला आहे. याप्रकरणी स्थानिक रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून घेण्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

रमेश सखाराम भाष्कर (३३) व मंगलदास तुलाराम वरखडे (४९) यांनी फिर्यादी कार्तीक रमेश खंगार इतर गुंतवणुकदारांची १४ लक्ष रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याबाबतचा गुन्हा पोलिस स्टेशन रामनगर येथे नोंद करण्यात आला आहे. आरोपीच्या चौकशीमध्ये चंद्रपुर जिल्हयातील गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवून फसवणूक केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराची ठेवी परत करण्याकरीता महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधिल हितसंबंधांचे सरंक्षण) अधिनियमांतर्गत या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ठेवी परत मिळण्याकरीता आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथे वैध दस्ताऐवजासह ठेवी परत मिळण्याचा फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर आरोपी रमेश सखाराम भाष्कर (वय 33 वर्षे) रा. स्नेहनगर परळी वैद्यनाथ जि. बीड, आणि मंगलदास तुलाराम वरखडे, (वय 49 वर्षे), रा. हनुमान मंदीर जवळ लोहारा ता. जि. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलिस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande