
रत्नागिरी, 30 मार्च, (हिं. स.) : वाइल्डलाइफ अनलिमिटेड, चिपळूण (रत्नागिरी), वन विभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने नीलेश बापट निसर्ग कट्टा अंतर्गत ‘मुशाफिर जंगलवाटांचे’ या कार्यक्रम मालिकेत मंगळवारी, दि. ३१ मार्च रोजी माहितीपट सादर करण्यात येणार आहे.
‘लाइफ फोर्स : इंडियाज वेस्टर्न घाट्स’ या विषयावरील सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांच्या माहितीपटाचे सादरीकरण होणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवारी, दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता निसर्गसेवक कै. नीलेश बापट छायाचित्र दालन, वन भवन, प्रभात रोड, मार्कंडी, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
निसर्ग आणि वन्यजीवांबद्दल आवड असणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी